Panchamrut / Panchamrit / पंचामृत

#Panchamrut #Panchamrit #पंचामृत #तुळशीविवाह #SweetDrink #HeathyDrink #AaichiSavali
        
पंचामृत म्हणजे देवांच्या षोडशोपचार पूजेसाठी लागणारे सर्वात आवश्यक असे मानले जाणारे आणि प्रामुख्याने दुध, दही, तुप, मध आणि साखर या घटकांपासुन बनवले जाणारे अमृत. भारतीय संस्कृती मध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेतील ही एक परंपरा, ती म्हणजे देवस्थानांमध्ये देवदेवतांच्या मुर्तींचे पंचामृताने अभिषेक केला जातो. हा पंचामृताचा अभिषेक करताना, पूजाविधीमध्ये समाविष्‍ट असलेल्या प्रत्‍येक पदार्थासाठी एक मंत्र दिलेला असतो. देवांना पंचामृताने स्‍नान घडवल्‍यानंतर ते पंचामृत प्रसाद म्हणुन वाटले जाते. तर असे हे पंचामृत दुध, दही, तुप, मध आणि साखर यांचे एकत्रित मिश्रण करून बनवलेले अमृत. काही ठिकाणी पंचामृत बनवताना तुळशीची पाने किंवा केशरही वापरण्याची प्रथा आहे.
        


Panchamrit, which is considered to be the most necessary for the auspiciousness of Gods and primarily made from milk, curd, ghee, honey, and sugar. This tradition is one of the traditions that have gone on for thousands of years in Indian culture, that is that the idols of gods and goddesses are consecrated by the Panchamrut in Devasthanas. After God made a bath from the Panchamrada, it is considered as a Panchamrita Prasad. So, this is the elixir made by a combination of this Panchamrita milk, yogurt, ghee, honey, and sugar. In some places, it is customary to use Tulsi leaves or saffron while making panchamrta.

असा हा या पंचामृताचा महिमा आहे, त्याबरोबरच याचा रोजच्या आहारात समावेश केला तर निरोगी राहण्यासाठी खुप मदत होते. पंचामृताचा आहारात समावेश केल्याने शरीराची पचण शक्ति सुधारते, लठ्ठपणा कमी करण्यासाठीही मदत होते, हाडे मजबुत होतात, रात्री झोप शांत लागते आणि सकाळी फ्रेश वाटते, बुद्धी वाढते, त्वचा चमकदार आणि टवटवीत होण्यासाठी मदत होते. गर्मीच्या दिवसांमध्ये थकवा दूर होण्यास मदत होते. दुधामध्ये कैल्शियम प्रोटिन असते, मनामध्ये कार्बोहाइड्रेट असतात, त्यामुळे ताकद, स्टैमिना वाढण्यास मदत होते.
         पंचामृतात वापरल्या जाणा-या प्रत्येक घटकांचा प्रतिकात्‍मक विचार करण्‍यात आला आहे, तो अशा प्रकारे,
१) दूध - दुध पंचामृतासाठी लागणारा महत्त्वाचा पहिला घटक. हे रंगाने शुभ्र, दुधाला आपल्या संस्कृतीत पावित्र्याचे प्रतिक मानले गेले आहे. यामध्‍ये माणसाने दूधाप्रमाणे निष्‍कलंक व्‍हावे असा अर्थ सुचित करत आहे.
*दुधामध्ये कैल्शियम, प्रोटिन, विटामिन आणि बरेच पोषक तत्व असतात. हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे दुध.

२) दही - हे दुधापासुन बनलेले आणि दूधासारखेच दिसणारे, दही हे भरभराटीचे प्रतिक आहे.  अशा ह्या दह्यामध्ये इतर पदार्थांना स्‍वतःच्‍या गुणामध्‍ये रुपांतरीत करण्याचा गुणधर्म आहे. पंचामृतातील अविभाज्य घटक असणारे हे दही सुचित करते की, माणसाने प्रथम निष्‍कलंक व्‍हावे आणि चांगले गुण आत्मसात करावे आणि त्‍यानंतर आपल्या सहवासामध्‍ये येणा-या इतर व्‍यक्‍तींनाही तसाच संदेश द्यावा.
*दही पचनास मदत करते, तसेच कैल्शियम चे प्रमाण जास्त असल्याने हाडे बळकट होण्यास आणि दात, हिरड्या आणि नखे मजबूत करण्यासाठीही मदत होते.

३) तुप - हे स्निग्‍ध पदार्थ म्हणून ओळखले जाते, तर हे तुप स्‍नेहाचे आणि विजयाचे प्रतिक आहे. माणसाची सर्व नाती स्‍नेहपूर्ण असावीत असे हे सुचित करते.
*तुपामध्ये हेल्दी असतात, यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते, तुप पोटामध्ये असिड लेव्हल बैलंस करते, यामुळे डायजेशन ठिक राहते. अ जिवनसत्व असल्यामुळे, तुपाच्या सेवनाने डोळे हेल्दी राहतात.

४) मध - मध हे चविने गोड असते आणि त्‍याच्‍ यामध्ये एकीचे गुण आहेत आणि ते शक्तिवर्धक आहे. व्‍यक्‍तीने मधाप्रमाणे शक्तिवान असावे आणि परस्‍परांशी एकीने वागावे असे त्‍यातून सुचित होते.
*मध हे रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी मदत करते. मधाचे सेवन उपाशीपोटी कोमट पाण्याबरोबर केल्याने पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी उपयोग होतो. तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित राहण्यासाठी उपयुक्त आहे.

५) साखर - साखर हे आनंदाचे प्रतिक मानले जाते. कोणत्याही शुभकार्या ची सुरुवात  साखरेने होते. अशी ही साखर सुचित करते की, प्रत्येकाने आपल्या भाषेत, बोलताना माधुर्य ठेवावे.
*साखरेचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे, साखर खाल्ल्याने तात्काळ ऊर्जा मिळते, म्हणुन एखाद्याला चक्कर आली असेल, तर साखर आणि पाणी दिले जाते.

तुळशीच्या पानांचा उपयोग शरीराची रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी होतो. वेदांमध्ये म्हटले गेले आहे की, पंचामृताच्‍या वापरामुळे मानवास देवांकडून हव्‍या असलेल्‍या गोष्‍टी प्राप्‍त होतात.

असा ह्या पंचामृताचा महिमा आहे, त्याबरोबरच याचा रोजच्या आहारात समावेश केला तर निरोगी राहण्यासाठी खुप मदत होते. पंचामृत आहारात समावेश केल्याने शरीराची पचण शक्ति सुधारते, लठ्ठपणा कमी करण्यासाठीही मदत होते, हाडे मजबुत होतात, रात्री झोप शांत लागते आणि फ्रेश वाटते, बुद्धी वाढते, त्वचा चमकदार आणि टवटवीत होण्यासाठी मदत होते. गर्मीच्या दिवसांमध्ये थकवा दूर होण्यास मदत होते. दुधामध्ये कैल्शियम प्रोटिन असते, मनामध्ये कार्बोहाइड्रेट असतात, त्यामुळे ताकद, स्टैमिना वाढण्यास मदत होते.

Preparation Time : 2 Minutes
Ingredients :

  1. Milk ½  cup / दुध १/२ कप
  2. Ghee 1 tbsp / तुप १ चमचा
  3. Honey 1 tbsp / मध १ चमचा
  4. Sugar 1 tbsp / साखर १ चमचा
  5. Curd / Dahi 2 tbsp / दही २ चमचे

Recipe :
  1. In a bowl, mix all ingredients and whisk well to make nectar like consistency.
  2. Garnish with Saffron / Tulsi leaves.

Dietary Comments :
Based on a 2000 calorie diet.
Per serving contains 287 calories, along with carbohydrates - 32.3 g, fats - 13.1 g, proteins - 6.7 g.  
Eat Healthy, Stay Healthy!!!

2 comments:

Latest Video Recipes from YouTube

Insta Feed